भीमा कोरेगाव, मराठा मोर्चा : 864 गुन्हे मागे घेतले जातील – देवेंद्र फडणवीस

0

मुंबई : पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांसारखे गंभीर गुन्हे वगळता अन्य शेकडो गुन्हे मागे घेतले जातील असे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केले. मराठा क्रांती मोर्चा व भीमा कोरेगाव प्रकरणी झालेला हिंसाचार यामध्ये हजारो तरूणांना विनाकारण गोवण्यात आल्याचे आरोप करण्यात आले होते. तसेच अनेक तरूणांचे भवितव्य यामुळे धोक्यात येऊ शकतं अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे हे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत या संदर्भातली संपूर्ण आकडेवारीच आज जाहीर केली. त्यासोबतच शेकडो गुन्हे मागे घेण्यात येत असल्याचे घोषित केले.

भीमा कोरेगाव, मराठा मोर्चा या दोन्ही प्रकरणांमध्ये एकूण 1198 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी एकूण 864 प्रकरणातील गुन्हे एकतर मागे घेतले आहेत किंवा मागे घेण्यात येत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच 109 प्रकरणातील गुन्हे हे गंभीर स्वरूपातील असून ते मागे घेता येणार नाहीत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.