भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ मोर्चा

0

जळगाव । भिमा कोरेगाव येथील विजयी क्रांती स्तंभास अभिवादन करण्यासाठी गेलेल्या नागरीकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आज समता समाज मंडळातर्फे मोर्चा काढुन निषेध करण्यात आला. पेशवाई विरोधातील लढ्याला 1 जानेवारी रोजी 200 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल भिमा कोरेगाव येथील विजयी क्रांती स्तंभास अभिवादनासाठी जमलेल्या जनसमुदायावर दगडफेक करून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याविरोधात संपुर्ण राज्यभरातुन निषेध व्यक्त केला जात असुन आज जळगाव शहरातही या घटनेविरूध्द संताप व्यक्त करण्यात आला.

भ्याड हल्ल्याची सीआयडी चौकशीची मागणी
समता समाज मंडळातर्फे आज सकाळी समतानगर येथुन मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व रिपाइं (आ)चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल व मुकूंद सपकाळे यांनी केले. हा मोर्चा काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. याठिकाणी झालेल्या द्वारसभेत अनिल अडकमोल आणि मुकूंद सपकाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच भिमा कोरेगाव येथील भ्याड हल्ल्याची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी केली. द्वारसभेनंतर मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन दिले.

मोर्चात यांचा होता सहभाग
निवेदन देतवेळी विशाखा सोनवणे, किरन शिंदे, स्मिता सोनवणे, रेखा बिर्हाडे, कल्याणी साळवे, सोनाली सोनवणे, स्वाती नरवाडे, सुमनबाई इंगळे, लताबाई शिंदे, शोभा साळवे, शिंदुबाई सुरवाडे, रेणुकाबाई अडकमोल, मनिषा बाविस्कर, कलाबाई अहीरे, नंदाबाई साळुंखे या उपस्थित होत्या. मोर्चात सचिन अडकमोल, दिलीप सपकाळे, बबलु शिंदे, राहुल वाघ, राजेंद्र साळुंके, किरण अडकमोल, किरण पवार, संभाजी नन्नवरे, संदीप साळवे, राजेश बाविस्कर, सचिन गायकवाड, व्ही.डी. नन्नवरे, संगीता अडकमोल, लताबाई शिंदे, सिध्दार्थ वाघ, आशाबाई बाविस्कर, माधव निकम, मुकेश खिल्लोरे, शेखर सोनवणे, प्रदीप नन्नवरे, रमजान खाटीक, जुबेर खाटीक आदी सहभागी झाले होते.