पुणे- भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी सुधा भारद्वाज, अरुण परेरा आणि वर्नन गोन्साल्विस या तीन आरोपींना मंगळवारी पुणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तत्पूर्वी त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना कर्टात हजर करण्यात आले होते. भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेले आरोपी अरुण परेरा यांनी आपल्याला पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान मारहाण झाल्याचा आरोप कोर्टासमोर जबाब देताना केला. या मारहाणीनंतर आपल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
यावेळी कोर्टासमोर साक्ष देताना परेरा म्हणाले, ४ नोव्हेंबर रोजी पुणे पोलिसांच्या कोठडीत चौकशी दरम्यान पोलिसांनी आपल्या ८-१० वेळा कानशिलात लगावल्या. अशा प्रकारे गंभीर मारहाण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ५ नोव्हेंबर रोजी मला रुग्णालयात दाखल करण्यात आले.