राजगुरुनगर । राजगुरुनगर येथील भीमा नदीपात्रावर होणार्या पुलाचे काम वेगात सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागनी नागरिकांमधून जोर धरत आहे.या पुलामुळे शहरातील वाहतूककोंडी कमी होणार आहे.
केंद्रीय रस्ते मार्ग निधी 2016-17 अंतर्गत नदीपात्रावर 11 कोटी खर्च करून पूल बांधण्यात येत आहे. केदारेश्वर बंधार्याजवळ हा पूल बांधण्यात येत आहे. यामुळे कडूस रस्ता व राजगुरुनगर शहरात जाणारा रस्ता जोडला जाणार आहे. राजगुरूनगर शहरातून जाणार्या पुणे-नाशिक महामार्गावर चांडोली ते थिगळस्थळ दरम्यान रस्त्यावर नेहमी वाहतूककोंडी होते. तसेच शहरातही पाबळ चौक, वाडारोड, बाजारपेठ येथेही वाहतूककोंडी होते. त्यासाठी पर्यायी मार्ग व्हावा, ही मागणी वारंवार करण्यात येत होती. त्याची गंभीर दखल घेत या पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.