मुंबई – डिजिटल धन योजनेचा प्रसार करण्यासाठी केंद्रशासनान देशभरात ऑनलाईन व्यवहार होण्यासाठी विविध योजना आखत आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने भीम (भारत इंटरफेस फॉर मनी) हे अॅप तयार केले असून आता ते मराठीतही उपलब्ध झाले आहे. या अॅपमध्ये देशातील तीन प्रादेशिक भाषांचा नव्याने समावेश केल्याने आता एकूण 12 भाषांमध्ये हे अॅप वापरता येणार आहे.
नॅशनल पेमेंट्स काऊन्सिल ऑफ इंडियाने भीम अॅपचे अपग्रेड व्हर्जन लॉन्च केले. ङ्गइकखच् 1.3 असे हे नवे व्हर्जन अँड्रॉईड आणि आयओएस यूझर्ससाठी असून, तीन नवीन फीचर्सचा यात समाविष्ट करण्यात आला आहे. यात जर कॅशलेस व्यवहारासाठी कुणी भीम अॅप वापरत असेल, तर त्यांना भाषेचा अडसर येऊ नये, यासाठी या अॅपमध्ये आणखी तीन प्रादेशिक भाषा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये मराठी, पंजाबी आणि आसामी भाषांचा समावेश आहे. हे अॅप वापरणारे आता बेनिफिशियरी निवडीसाठी आपल्या फोनमधील काँटॅक्टचा वापर करु शकतात. मात्र, इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे ज्यांचे मोबाईल नंबर भीम अॅपमध्ये नोंदवलेले असतील, त्यांनाच बेनिफिशियरी म्हणून निवडता येईल. तसेच नॅशनल पेमेंट्स काऊन्सिल ऑफ इंडियाने भीम अॅपच्या अपग्रेडेड व्हर्जनमध्ये टठ कोडचा पर्यायही समाविष्ट केला आहे. त्यामुळे स्कॅन अॅण्ड पे याकरता हा पर्याय उपयुक्त ठरणार आहे.