अहमदनगर : अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर बोलेरो जीपने समोरुन येणार्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात जीपमधील सातही जणांचा जागीच मृत्यू झाला.
बोलेरो जीपमधील (एमएच 12 एफएफ 3392) प्रवासी सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जात होते. रात्री दोनच्या सुमारास नगरजवळ धनगरवाडी फाट्याजवळ जीप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. जीपने औरंगाबादहून नगरकडे येणार्या ट्रकला (एमएच 20 4650) जोरदार धडक दिली. अपघातात मृत्यूमुखी पडलेले सातही जण पुण्यातील यवतमधील रहिवासी होते. सर्व मृतदेह नगरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
मृतांची नावे :
मनोहर रामभाऊ गायकवाड (45), अंकुश दिनकर नेमाने (45), मुबारक अबनास तांबोळी (52), बाळू किरण चव्हाण (50), स्वप्नील बाळू चव्हाण (17), गोकुळ रामभाऊ गायकवाड (40), अरुण पांडुरंग शिंदे (50) हे सर्व जण यवत ता. दौंड, जिल्हा पुणे येथील आहेत.