भुकेल्यांचा मदतीसाठी नवापूरकरांची माणुसकी

0

नवापूर (हेमंत पाटील): संपूर्ण जगात कोरोणा विषाणु बाधीतांची संख्या वाढत असून लाँकडाऊनच्या परिणाम सर्वत्र दिसून येत आहेत.घराबाहेर पडता येत नसल्यामुळे अनेक मोलमजुरी करणारे गरीब कामगार यांच्यावर उपास मारीची पाळी आली आहे.अनेक निराधार भुक्या पोटी फिरताना दिसत आहे .रोज कमवुन खाणारे काम नसल्याने त्यांची उपासमारी होत आहे.त्यांची उपासमारी टाळावी यासाठी नवापूर शहरातील दानशूर व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते ,युवा वर्ग यांनी पुढाकार घेत अन्नदान व मदत कार्य सुरू केले आहे.

नवापूर शहर हे गुजरात सीमेवर वसलेले सर्व धर्मीय ,बहुभाषिक लोकांचे शहर आहे या शहरात अनेक संकटे आली त्यावेळी मदतकार्या साठी नवापूरकर धावुन आले आहेत.वेळोवेळी माणुसकीचे दर्शन घडवले आहे. मागच्या वर्षी रंगावली नदीला आलेल्या महापुरात अनेक गोरगरिबांचे घरे वाहुन गेली होते ते निराधार झाले अशावेळी नवापूर करांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीच्या परिचय घडवुन देत सगळ्यांना अन्न व संसारोपयोगी साहित्य देऊन माणुसकीच्या सच्चाईचे प्रत्यय आणून दिला होता.

सध्या कोरोणामुळे सर्वत्र बंद असतांना गरीब वसाहतीत असलेले लोक,महिला,लहान मुल, भिक्षुक, पाळीव प्राणी अशांना अन्न पोहोचून नवापूर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते दानशूर कार्य करत आहेत. महामार्गावर अन्य राज्यातून आलेले ट्रकचालक अडकले आहेत अशांना आरटीओ चेक पोस्ट जवळ जेवण करून सामुहिक भोजनही करवले जात आहेत.तर काही सामाजिक कार्य करणारे युवक दुपारी व रात्री शहरातील अनेक घरातून अन्न गोळा करून ते अन्न झोपडपट्टीत राहणारे, उघड्यावर झोपणाऱ्या गरिबांना व भिक्षुकांना पोचवले जात असून संकटाचा या काळात नवापूरकरांनी माणुसकीचे दर्शन घडवून आपण लवकरच कोरोणावर मात करून विजय मिळवून दाखवू याची ग्वाही दिल्याचे दिसुन येत आहे.या कार्यासाठी अनेक युवक पुढे येत असून दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत आहेत .अनेक युवकांनी या या आपत्ती काळात कठीण प्रसंगी स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी स्वतः चे नाव लिहुन दिले आहेे या परिस्थितीत हे स्वयंसेवक आपली भूमिका बजावतील असेही त्यांनी सांगितले आहे . गोरगरिबांना अन्न मिळत असल्याने तूर्तास त्यांची उपासमार टळली आहे हे फक्त नवापूरकरांचा माणुसकी मुळे घडले आहे.गरिबांचा मदतीसाठी नवापूर कांची माणुसकी धावली आहे.

१४४ कलम असल्याने सर्व बंद आहे.लोकांना अन्नदान करुन उपासमार टाळली जात असतांना मोकाट फिरणारे पाळीव प्राणी चारा व खायला नसल्याने भुके फिरतांना दिसत आहे. अशा प्राणांना खायला मिळावे म्हणुन शहरातील अनेक युवक एकत्र आले व त्यांनी चारा व अन्न आणुन ज्या भागात प्राणी दिसतील तेथे जाऊन त्यांना खाऊ घातले जात आहे.यातुन माणसुकीसोबत प्राणीदया समोर आली आहे.या नवापूरकरांचा कार्याला सलाम करत आहे.

कोरोना महामारीचा काळात सर्वत्र लोकडाऊन असतांना काही नगरसेवक फोटो न काढता गुप्त गोर गरिब वसाहतीत जाऊन रोज अन्नदान करत आहेत.संसारपयोगी वस्तु ही देत आहे.तर काही फोटो काढुन सोशल मिडीयावर टाकत असुन या प्रकाराकडे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.तर काही नगरसेवकांनी आपल्या प्रभात मदत कार्य व स्वता औषध फवारणी करत आहे.