भुजबळांकडून खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे संकेत

0

जळगाव: गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेले भाजपचे दिग्गज नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत जाणार आहेत अशी चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाला असल्याचा दावा देखील खडसे समर्थक आणि राष्ट्रवादीचे नेते करत आहे. १७ ऑक्टोंबरला खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जातो आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे संकेत दिले आहे. ‘खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अधिकृत बोलणे माझी जबाबदारी नाही परंतु खडसे राष्ट्रवादीत येणारच नाही असेही नाही’ असे सूचक विधान छगन भुजबळ यांनी केले आहे.

माजी आमदार उदयसिंग पाडावी यांनी खडसे १७ ऑक्टोंबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर भुजबळ यांनी दिलेले संकेतामुळे खडसे यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. राज्यापाल नियुक्त विधान परिषद सदस्यांमध्ये खडसे यांच्या नावाची शिफारस राष्ट्रवादीकडून करण्यात येणार असल्याची चर्चा देखील आता सुरु झाली आहे.

काल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावला होते. त्यावेळी फडणवीस यांनी ‘खडसे यांना राजकारण चांगले कळते ते पक्षांतर करण्याचा चुकीचा निर्णय घेणार नाही’ असे विधान केले होते.