भुजबळांचा जामीनअर्ज फेटाळला

0

मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणांतर्गत गेल्या 21 महिन्यांपासून कैदेत असलेले माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा जामीनअर्ज पीएमएलए कोर्टाने फेटाळला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी भुजबळ मार्च 2016 पासून अटकेत आहेत.

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) कलम 45 हे सर्वोच्च न्यायालयाने मागच्या महिन्यात घटनाबाह्य ठरवल्यानंतर जबळ यांना जामीन मिळण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत होती. भुजबळ यांच्याविरुद्ध मनी लॉण्डरिंग कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कायद्यातील कलम 45 च्या तरतुदीमुळेच भुजबळ यांना अद्याप जामीन मिळू शकलेला नाही. ईडीने या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला असून, पीएमएलएचे कलम 45 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले असले तरी त्याआधारे भुजबळांना जामीन देता येणार नाही. त्यांना आपण गुन्हा केला नाही हे सिद्ध करावे लागेल, अशी भूमिका ईडीने घेतली आहे.