शहादा । ओबीसी नेता भविष्यकाळात डोईजड होऊ नये म्हणून सत्ताधार्यांनी माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांना चौकशीचा नावाखाली तुरुंगात डांबले आहे. सर्वोच्च न्यायालयाने भुजबळ याच्यांवरील लावलेले 44 कलम रद्द केलेले असूनही शासन मात्र त्याांचा जामीन होऊ देत नसल्याचा आरोप करीत शासनाला वठणीवर आणण्यासाठी मंत्रालयावर भुजबळ समर्थकांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असून समर्थकांनी आत्तापासुनच कामाला लागावे, असे आव्हान अखिल भारतीय समता परिषदेचे राज्याचे सरचिटणीस डॉ. कैलास कामोद यांनी केले. शहाद्यात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
शहादा विश्रामगृहावर छगन भुजबळ समर्थकांची बैठक डॉ. कैलास कुमोद यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी राष्ट्रवादी चे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गावीत, धुळे जिल्हा समता परिषद अध्यक्ष देवेंद्र पाटील, शहादा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष इश्वर पाटील, समता परिषद जिल्हा अध्यक्ष नंदुरबार अशोक माळी , राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस अनिल भामरे, राजेंद्र वाघ वासुदेव पाटील, वेडु पाटील, विनोद अहिरे, जगदीश माळी, सुरेंद्र कुवर, इश्वर माळी, प्रवीण वाघ, बापु घोडराज , सी डी माळी आदि मान्यवर उपस्थित होते. राजेंद्र गावीत म्हणाले की छगन भुजबळ समर्थनार्थ राष्ट्रवादी रस्त्यावर उतरण्यास तयार आहे.