जळगाव। कान्य कुब्ज भुजवा भडभुजा समाज बहुद्देशीय संस्थेद्वारे समाजातील युवक युवतीसाठी विवाह परिचय मेळावा व सामुहिक विवाहाचे अयोजन 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी या दोन दिवस करण्यात आले. हा कार्यक्रम आय.एफ.सी.गोडाऊनमध्ये घेण्यात आला. विवाह परिचय मेळाव्याचे उद्घाटन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. उमहापौर ललीत कोल्हे यांच्या हस्ते गुप्ता समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
देशभरातील समाजबांधवांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी समाजातील सुमारे 200 युवक व युवतींनी परिचय करून दिला. यावेळी दहा जोडप्यांचा सामुहिक विवाह करण्यात आला तर तीन जोडप्यांचा साखरपुडा झाला. दुसर्या दिवशी 1 फेब्रुवारी रोजी सामुहिक विवाहचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हा निवाशी उप-जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करण्यात आले. याप्रसंगी महानगर पालिका माजी स्थायी सभापती ज्योती चव्हाण, नगरसेविका उज्वला बेंडाळे आदी उपस्थित होते. या मेळाव्यास महाराष्ट्र राज्यसह देशभरातून उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व इतर राज्यातील जवळपास 3 ते 4 हजार समाज बांधव उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचालन जगदीश गुप्ता, दीपककुमार गुप्ता, कु. पुनम यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विलास गुप्ता, कैलाश गुप्ता, राजेश गुप्ता, प्रदीप गुप्ता, दिपककुमार गुप्ता, रोहन गुप्ता, रोहन गुप्ता, संजय परदेशी, दिपक परदेशी, प्यारेलाल परदेशी आदींनी कामकाज पाहिले.