भुतकाळ विसरुन वर्तमानात जगा

0

जळगाव। महाराष्ट्र कृषी विभागाचे उपाध्यक्ष व संशोधन परिषद धुळे डॉ. राम खर्चे यांचे आज डॉ उल्हास पाटील कृषी,कृषी अभियांत्रिकी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात भव्य स्वागत करण्यात आले.महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष,संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील,संस्थेच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, प्रमुख अतिथी प्रकल्प अधिकारी कृषी महाविद्यालय मुक्ताईनगर येथील डॉ सुदाम पाटील, केळी संशोधन केंद्राचे डॉ एन ए शेख, प्राचार्य डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्यालय डॉ एस एम पाटील, कृषी अभियांत्रिकी व अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए पी चौधरी, इ मान्यवर यावेळी उपस्थीत होते.

संशोधनावर भर देण्याचे केले आवाहन
डॉ. राम खर्चे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना भुतकाळाचा विचार न करता वर्तमानात जगायला शिका, सतत परिश्रमाची कास धरून या देशासाठी जगा असे सांगत कृषी क्षैत्रात विविध संधी असल्याचे सांगीतले. शेतकर्‍यांच्या विकासासाठी कृषी अभियंत्यांची महत्वाची भुमिका बजावण्यासाठी संशोधनावर भर दयावा असेही ते म्हणाले. मान्यवरांनी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

व्यक्तीमत्वाविषयी दिली माहिती
माजी खा डॉ उल्हास पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ राम खर्चे यांच्या व्यक्तीमत्वाविषयी माहिती देत त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा अवलंब विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन केले. डॉ एस एम पाटील यांनी प्रास्ताविकात गोदावरीच्या विविध संस्था व डॉ. राम खर्चे यांच्या आयुष्यातील क्षण विषद केले. आभार डॉ.ए.पी. चौधरी, प्रा. परिस यादव यांनी मानले.