नवापूर: समाजात काही अशा व्यक्ती असतात जे निस्वार्थ सेवा करत असतात. कोरोना विषाणुच्या संकटात गरिबांना समाजातील अनेक घटक मदतीचा हात देत असतांना उपाशी पोटी मुक प्राण्यांचे हाल नये म्हणुन नवापूर शहरातील सामाजिक कार्यकर्त,सेवानिवृत्त कर्मचारी लालजी अहिरे हे शहरात एकटे फिरुन गल्लोगल्ली घरासमोर जाऊन पोळ्या, भाकरी आणून वते प्राण्यांना घाऊ घालत आहेत.
आपल्या जीवाची पर्वा न करता ते हे कार्य करत आहेत.
या धरतीवर जीवसृष्टीवर ही आहे हे लोक विसरून असतांना लालजी अहिरे हा अवलिया व्यक्ती आजच्या या “कोरोना” सारख्या महारोगाच्या वेळी देखील मुक्या प्राणिमात्रासाठी दारोदार पोळ्या,भाकऱ्या मांगण्यासाठी फिरत आहे.आणि हे सर्व अन्न गोळा करून भुकेल्या प्राणीमात्रांना गोमातेला, कुत्र्यांना,खाऊ घालत आहे.येता जाता ‘जय श्री राम’ म्हणत आपलेसे करणारे लालजी काका हे भूतदया ही ईश्वर सेवा मानतात.यापुर्वी ते रोज गोमातेला अन्न खाऊ खातल्या शिवाय जेवण करत नाहीत.त्यांचा या कार्याला शहरातील घराघरातुन सहकार्य मिळत असुन त्यांचा या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.