भुयारी गटार योजनेचा पुर्नविचार करावा

0

किशोर भेगडे यांचे निवेदन

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या भुयारी गटार योजनेतील त्रुटी दूर करून त्याचा पुर्नविचार करावा. अशी मागणी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे यांनी मुख्याधिकारी वैभव आवारे यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या 58 कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेला राज्यशासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. या योजनेचा आराखडा पारंपारिक पध्दतीने तयार केला आहे. नगर परिषदेच्या हद्दीची भौगोलिक परस्थिती पाहता हा प्रकल्प खर्चिक आणि वेळखाऊ,व पर्यावरणास बाधक असल्याची खंत भेगडे यांनी केली आहे.

शासनाकेडे स्थगितीची मागणी करावी
यामुळे शहरातील चांगले रस्ते खोदावे लागणार आहेत. तसेच अंतर्गत रस्तेही खोदावे लागणार असल्याने योजनेचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून या योजनेचा अतिरिक्त खर्चामुळे नागरिकावर प्रचंड कराचा बोजा पडणार आहे. नगर परिषदेने तंत्रज्ञान युक्त पर्यावरण पूरक प्रकल्पाची तज्ञांकडून माहिती घेऊन या योजनेचा पुर्नविचार करण्यासाठी शासनाकेडे स्थगितीची मागणी नगर परिषदेने करावी असे भेगडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.यावेळी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे नगरसेवक अरुण माने, नगरसेविका वैशाली दाभाडे उपस्थित होते.