भुयारी गटार योजनेसाठी 58 कोटी मंजुर : आ.भेगडे

0

तळेगाव दाभाडे :- तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नव्याने होत असलेल्या 58 कोटी रुपये खर्चाच्या भूयारी गटार योजनेला राज्यशासनाने मंजुरी दिली असून तीन महिन्याचे आत सदर कामाला सुरुवात करण्यात येईल असे आमदार बाळा भेगडे यांनी सांगितले.

मुंबई येथे मंत्रालयात (दि. 27) रोजी या बाबत तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होत्या. यावेळी आमदार संजय(बाळा)भेगडे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके,जेष्ठ नगरसेवक इंदरमल ओसवाल, माजी नगरसेवक गणेश भेगडे, नगरसेवक संग्राम काकडे,संदीप शेळके, रोहित लांघे,संतोष शिंदे,जेष्ठ नगरसेविका सुलोचनाताई आवारे,नीता काळोखे,शोभा भेगडे, कल्पना गटे,विभावरी दाभाडे,अनिता पवार, दत्तात्रय नाटक, रजनी ठाकूर, राहुल गोळे,आशुतोष हेंद्रे आदि मान्यवर उपस्थित होते.

नमोमी चंद्रभागा योजने अंतर्गत होणार काम
सदर भुयारी गटर योजना नामोमी चंद्रभागा योजने अंतर्गत होणार आहे. यासाठी शासनाकडून 58 कोटी रुपये खर्चाला मंजुरी भेटली आहे. हि योजना पुढील 2050 सालापर्यंत तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीत वाढणारी लोकसंख्या सुमारे एक लाख पच्चावन्न हजार डोळ्यासमोर ठेऊन आखली आहे.. तळेगाव दाभाडे नगर परिषदेला मागील दोन महिन्यापूर्वी सुधारित पाणी योजनेसाठी 55 कोटी रुपये,व आत्ता भुयारी गटर योजनेसाठी 58 कोटी रुपये शासनाकडून मंजूर झाल्याने लोकप्रतिनिधी कडून आनंद व्यक्त करण्यात येत असून गावकर्‍यांनी याचे स्वागत केले.