भुयारी मार्गासाठी 1 कोटी

0

पुणे । कोंढवा खुर्द येथील लुल्लानगर चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामामधील एच एम (सी टी सी) प्रवेश ते न्यू कमांड हॉस्पिटल या ठिकाणी भुयारीमार्ग बांधण्यासाठी खासदार स्थानिक विकास निधिअंतर्गत 1 कोटी रुपयांचा निधी पुणे महानगरपालिकेला उपलब्ध करून दिला असल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली.

उड्डाणपुलाच्या कामास एकूण 4 कोटी 48 लाख खर्च येणार असून त्यापैकी सुरुवातीचा 1 कोटी रुपयांचा निधी महानगरपालिकेने दिला आहे. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार उर्वरित रक्कमेची तरतूद ही खासदार व आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून उभी करावयाची आहे. त्यानुसार हा निधी उपलब्ध करून दिल्याचे शिरोळे यांनी सांगितले. त्याचबरोबर या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होऊन तो नागरिकांच्या सेवेत उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षादेखील शिरोळे यांनी व्यक्त केली आहे.