भुयारी मेट्रो मार्गासाठी ‘कंट्रोल्ड ब्लास्टिंग’

0

पुणे : भुयारी मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरूवात झाली असून, मंगळवारपासून ’कंट्रोल्ड ब्लास्टिंग’ करण्याला सुरूवात केली जाणार आहे. महामेट्रोचे मुख्यप्रकल्प अभियंता अतुल गाडगीळ आणि भुयारी मार्गाचे उपप्रकल्प व्यवस्थापक प्रकाश वाघमारे यांनी ही माहिती दिली.

शेतकी महाविद्यालयातील मेट्रो स्टेशनच्या कामाला सुरूवात झाली आहे. हा मेट्रोचा पहिला टप्पा असून, जमिनीमध्ये सुमारे 18 मीटरपर्यंत खोदाई करण्यात येणार आहे. जमिनीखाली कठीण दगड असल्याने यंत्रांच्या सहाय्याने तो फोडणे शक्य नाही. यासाठी तेथे ब्लास्ट करून ते फोडावे लागणार आहेत.हे ब्लास्ट कंट्रोल्ड असून, ते पूर्णपणे सुरक्षित असणार आहेत, अशी ग्वाही गाडगीळ आणि वाघमारे यांनी दिली. हे ब्लास्ट सकाळी 10 ते सायंकाळी 6 याच कालावधीत म्हणजेच दिवसा होणार असून, त्याची कल्पना आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशी आणि आस्थापनांना दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.