भुरट्या चोरट्यांचा उपद्रव वाढला

0

कल्याण : डोंबिवलीत भुरट्या चोरट्यांचा वावर वाढला असून या चोरट्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी परिसरात ओम विजयश्री कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे 46 वर्षीय महिला काल सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील मधूबन टॉकीज समोरील एका दुकानासमोर उभी असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील पिशवी ला ब्लेड मारत पिशवी मधील मोबाईल आणि रोकड लंपास केली काही वेळाने त्यांना पिशवीला ब्लेड मारून मोबाईल आणि पैसे चोरी गेल्याचे लक्षात आले.

या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अद्न्यत चोरट्या विरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .तर दुसरी घटना डोंबिवली पुर्वेकडील इंदिरा नगर पनवेल बस स्टॉप वर घडली आहे .नगर जिल्ह्यातील राजगुरू नगर मध्ये राहणारि महिला काही कामानिमित्त डोंबिवलित अली होती .पनवेल ला जाण्यासाठी तिने डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा नगर येथिल पनवेल बसस्टॉप गाठले बस ची वाट पाहत उभी असताना या बस स्टॉप वर असलेल्या गर्दीच्या फायदा घेत अज्ञात चोरट्याने तिच्या पर्स मधील दागिने असलेली पर्स चोरून तेथून पळ काढला .यंप्रकर्णी या महिलेने डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारि नुसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे