जळगाव : केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित, ललित कला अकादमी आयोजित भुलाबाई महोत्सवात पारंपरिक समूहनृत्य स्पर्धेत भगीरथ शाळेने प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल शाळेतर्फे विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गाैरव करण्यात अाला.
भगीरथ शाळेने वृक्षसंवर्धन व पर्यावरणावर आधारित समूहनृत्य सादर केले होते. हे पारंपरिक गीत प्रीया सफळे यांनी लिहिले होते. याला संगीत शिक्षक राजू क्षीरसागर आणि जे. एस. चौधरी यांनी दिग्दर्शित केले होते. समूह नृत्यात १८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रथम येणाऱ्या या संघाला ट्रॉफी, २ हजार ५०० रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात आले. विजयी संघाचे मुख्याध्यापक नेहा जोशी, एस. डी. भिरुड यांनी गौरव केला आहे.