भुषण कॉलनीतील 40 वर्षीय व्यक्ती बेपत्ता

0

जळगाव । रामांनद नगर परीसरातील भुषण कॉलनीत राहणार्‍या 40 वर्षीय व्यक्ती मुंबईला मित्राकडे जातो असे सांगून गेलेला व्यक्ती मित्रांकडे पोहचलाच नाही अशी माहिती कुटुंबियांना मिळाल्यानंतर त्यांनी आठवडाभर शोधाशोध सुरू केली. मात्र कोठेही मिळून न आल्याने रामानंद पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, विजय प्रमोद पाटील (वय-40) रा. भुषण कॉलनी हे 2 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता मुंबईला मित्राकडे जात असल्याचे सांगून घरून निघाले. मात्र दुसर्‍यादिवशी ते मित्राकडे पोहचले नसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांची पत्नी आणि आई यांनी त्यांचा नातेवाईकांकडे तपास केला. तसेच बसस्थानक, रेल्वेस्थानकासह इतर परीसरात देखील चौकशी केली. तपास आणि चौकशी करून मिळून न आल्याने आई उर्मिला प्रमोद पाटील (वय-60) यांच्या खबरीवरून रामानंद पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यांची उंची 5.5 फुट, डोक्याला टक्कल, शरीराने मजबूत, गोल चेहरा अशी व्यक्ती आढळून आल्यास रामानंद पोलीसात संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास पो.कॉ. योगेश वाघ करीत आहे.