भुसावळकरांना टंचाईची झळ, सहा दिवसाआड पाणी

0

भुसावळ- हतनूर धरणाचा जलसाठा 30 टक्क्यांवर आला असून धरणातून आवर्तन सोडण्यास काहीशी दिरंगाई होणार असल्याने पालिकेने नागरीकांना जपून व काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. जुलै महिन्यापर्यंत धरणातील पाणी साठा पुरवणे गरजेचे असून पालिकेने आता सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने ऐन भर उन्हाळ्यात शहरवासीयांची पाण्यासाठी भटकंती होणार आहे. शहरात कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिका प्रशासनाने कळवले आहे. शहरवासीयांनी पाण्याचा जपून व काटकसरीने पाण्याचा वापर करण्यासोबतच नळांना तोट्या बसवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.