पालिका प्रशासनाने निवेदनाद्वारे दिला इशारा : दूषित पाण्यामुळे आजाराची भीती
भुसावळ : शहराला गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने शहरात साथीचे आजार बळावण्याची भीती व्यक्त होत आहे. कधी आठ तर कधी दहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो मात्र असे असतानाही शुद्ध पाणी नागरीकांना कर भरूनदेखील ‘अ’ वर्ग असलेली पालिका पुरवू शकत नसल्याची खंत निवेदनाद्वारे जळगाव जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाच्या मार्फत पालिका प्रशासनाला मंगळवारी दिलेल्या निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना उत्तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे समन्वयक योगेंद्र पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, समन्वयक भगवान मेढे, उपाध्यक्ष ईस्माइल गवळी, महेंद्र महाले आदींची उपस्थिती होती.
आवर्तन सुटल्याने समस्या सुटणार : मुख्याधिकारी
भुसावळ शहराला पाणीपुरवठा करणार्या तापी नदी वरील बंधार्याची पाणी पातळी कमी झाल्याने तसेच पाणी बर्याच दिवसांपासून साठलेले असल्याने पाण्याला हिरवट रंग तसेच शेवाळाचा वास येत आहे. नगरपरीषद पाणीपुरवठा विभागाकडून पाण्यावर प्री-क्लोरिनेशनची प्रक्रिया करण्यात येत आहे तसेच अँलम व पॉली अॅल्युमिनियम क्लोराईड पावडर सुद्धा वापरण्यात येत आहे शिवाय
पाटबंधारे विभागाने हतनूर धरणातून 19 रोजी संध्याकाळी आवर्तन सोडल्याने पुढील चार ते पाच दिवसात आवर्तनाचे पाणी रेल्वे बंधार्यात पोहोचल्यानंतर शहराला पाणीपुरवठा स्वच्छ व दुर्गंधी विरहित होईल, असे मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी कळवले आहे.