भुसावळ प्रतिनिधी दि 3
येथील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील दत्त नगर, वांजोळा रोडवरील निखिल राजपूत हा मध्यरात्री निवृतीनगर येथील काशी विश्वेवर मंदिरा समोरील नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेच्या सिमेंटच्या टाकीच्या टेरेसवर झोपण्यास गेलेला होता. मयत याने दुस-या बाईसोबत प्रेमसंबध ठेवल्याने मयत हा त्याची पत्नी हीचेशी नेहमी भांडण करीत होता. त्याचा मनात राग ठेवुन यातील संशयित आरोपी निलेश ठाकुर याने चाकु सारख्या धारदार शस्त्राने मयताचे गळ्यावर, छातीवर वार करून गंभीर दुखापत करून जिवे ठार केल्याप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील कुविख्यात गुंड निखिल राजपुतच्या मारेकरी काही तासातच पोलिसांनी जेरबंद केले आहे. माहिती अशी की, सदर गुन्हयातील फिर्यादी सुरेश पांडु शिंदे, वय-68, व्यवसाय खाजगी बस चालक, रा-दत्तनगर वांजोळा रोड, भुसावळ यांनी पोलीस स्टेशन येवुन फिर्याद दिली की, दिनांक 02/09/2023 रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजताचे सुमारास निवृतीनगर येथील काविश्वेवर मंदिरा समोरील नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेच्या सिमेंटच्या टाकीच्या टेरेसवर त्यांचा मुलगा निखील सुरेश राजपुत [पाटील) वय 29 वर्षे, रा- दत्तनगर, वांजोळा रोड, भुसावळ हा झोपण्यास गेलेला होता. यातील संशयित आरोपी नामे निलेश चंद्रकांत ठाकुर (वय 22) राहणार कंडारी, तालुका भुसावळ हा मयताची पत्नी हीचा भाऊ आहे. यातील मयत याने दुस-या बाईसोबत प्रेमसंबध ठेवल्याने मयत हा त्याची पत्नी हीचेशी नेहमी भांडण करीत होता. त्याचा मनात राग ठेवुन यातील आरोपीताने चाकु सारख्या धारदार शस्त्राने मयताचे गळ्यावर, छातीवर वार करून गंभीर दुखापत करून जिवे ठार केले. त्यावरुन बाजारपेठ पोलीस स्टेशनला मयताचे (वडील) फिर्यादी यांनी आरोपीताचे विरुध्द फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा तपास मा.एम. राजकुमार पोलीस अधिक्षक,जळगांव,चंद्रकांत गवळी, अप्पर पोलीस अधिक्षक, जळगांव भाग, संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगांव भाग किसनराव नजनपाटील, पोलीस निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बबन आव्हाड, पोलीस निरिक्षक, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शना नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये यांनी केला असुन काही तासातच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोहेकॉ. विजय नेरकर, रमण सुरळकर, निलेश चौधरी, उमाकांत पाटील, यासीन सत्तार पिंजारी, महेश चौधरी,पोकॉ. योगश माळी, सचिन चौधरी, जावेद शहा, प्रशांत सोनार, योगेश महाजन, अमर आढाळे, पोना. दिनेश कापडणे, अमर आढाळे यांचे मदतनीने आरोपीतास लागलीच ताब्यात घेवुन अटक केली आहे. यातील मयत याचे प्रेताचे शवविच्छेदन होवुन अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.