भुसावळ : शहरातील समता नगरपाठोपाठ सिंधी कॉलनीत कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर सोमवारी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शहराला भेट दिली. शासकीय विश्रामगृहात प्रशासनातील अधिकार्यांसोबत बैठक घेत उभयंतांनी जामनेर रोडवरील सिंधी कॉलनी तसेच समता नगर भागात पाहणी करीत अधिकार्यांना उपाययोजनांबाबत काही सूचना केल्या.
शासकीय विश्रामगृहात अधिकार्यांसोबत बैठक
शहरातील शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. शहरात दोन भाग सील करण्यात आल्याने नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासह आरोग्य विभागाकडून होणार्या उपाययोजनांबाबत प्रसंगी माहिती जाणून घेण्यात आली तसेच प्रशासनाला काही सूचनाही करण्या आल्या. प्रसंगी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दीपक धीवरे, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, मुख्याधिकारी करुणा डहाळे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, शहराचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे आदींची उपस्थिती होती.
कंटेटमेंट झोनची केली पाहणी
समता नगरासह सिंधी कॉलनीत कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने हा भाग पूर्णपणे सील केला असून अतिअत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही या भागात जाण्या-येण्यास मनाई करण्यात आली आहे. सोमवारी जिल्हाधिकार्यांनी या भागाची पाहणी करून अधिकार्यांना सूचना केल्या. प्रसंगी आमदार संजय सावकारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.