यावल- मनुदेवीच्या दर्शनासाठी आलेल्या भुसावळ येथील 17 वर्षीय तरुणाचा पाझर तलावातील गाळात अडकल्याने बेपत्ता झाल्याची घटना रविवारी घडली. वैभव सजय गांजले (17, रा.गुंजाळ कॉलनी, भुसावळ) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो आडगाव येथील मनुदेवीच्या दर्शनासाठी आल्यानंतर पाझर तलावाजवळ गेला असता पाय घसरून पडल्याने गाळात त्याचा पाय रूतला तरुणांस पोहता येत नसल्याने त्याच्या मित्रांनी यावल पोलिसांना माहिती कळवली. रात्री उशिरापर्यंत या तरुणचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते मात्र यश न आल्याने सोमवारी त्याचा पुन्हा शोध घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.