भुसावळचा पारा पोहोचला 40 अंशावर

0
भुसावळ:- चैत्र महिन्याच वैशाख वणवा पेटल्याने शहरातील जनजीवनावर विपरीत परिणाम झाला जाणवत असून दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. त्यातच बुधवारी शहराचे तापमान तब्बल 40.5 अंशावर तर किमान तापमान 22.4 अंशावर पोहोचल्याने मे महिन्यात कसे होणार? या चिंतेने शहरवासीयांच्या मनात घर केले आहे. सकाळी नऊ ते दहा वाजेपासूनच उन्हाचे कडक चटके बसायला सुरुवात होते तर नागरीक भल्या सकाळीच आपली कामे करण्यासाठी बाहेर पडत आहेत तर सायंकाळपर्यंत तापमान कायम असल्याने सायंकाळी उशिराने नागरीक घराबाहेर पडताना दिसून येतात.
मे महिन्यात आणखीन वाढणार तापमान
मार्च अखेरीस तापमान 40 अंशाहून अधिक पोहोचल्याने अद्याप एप्रिल व मे महिन्याला अवकाशी असल्याने यापुढे कसे होणार  ? अशी चिंता शहरवासीयांना सतावत आहे. वाढत्या उकाड्यामुळे कुलरसह एसीला मागणी वाढली आहे. दीपनगर प्रकल्पामुळे शहराची हॉट सिटी म्हणून सर्वत्र ओळख आहे. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे 75 टक्यांपेक्षा अधिक असलेली हवेतील आर्द्रता आता 51 टक्क्यांवर पोचली आहे. यामुळे उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. तापमानाने चाळीशी ओलांडल्याने शहरातील जनजिवनावर विपरीत परिणाम होत आहे.