जळगाव : येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 37 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 34 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दोन व्यक्तींचे अहवाल तपासण्याची कार्यवाही सुरु आहे तर एक व्यक्तीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
पॉझिटिव्ह आढळलेली व्यक्ती ही भुसावळ येथील 58 वर्षीय महिला आहे. निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सम्राट कॉलनी येथील कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील पंधरा व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 58 इतकी झाली आहे. त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.