भुसावळ- भुसावळातील दुय्यम कारागृहाचे अधीक्षक जितेंद्र माळी यांची नंदुरबार येथे बदली झाली असून त्यांच्या जागी नाशिक येथून एम.के. खैरगे यांची नियुक्ती झाली आहे. राज्यातील चार कारागृह अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश अप्पर कारागृह महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांनी काढले. त्यात लातूर येथील कारागृह अधीक्षक जी.व्ही. पाटील यांची उस्मानाबाद, उस्मानाबाद येथील डी.एस. इगवे यांची सोलापूर, यवतमाळ येथील डी.एन.राऊत यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे.