उत्कृष्ट कार्याची दखल ; दिल्लीतील समारंभात पियुष गोयल यांनी गौरवले
भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत दिल्लीतील एका कार्यक्रमा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी यादव यांचा प्रशस्तीपत्रक देवून विशेष सन्मान केला. भुसावळातील जंक्शन स्थानकाचा गेल्या काही महिन्यातच बदललेला चेहरा-मोहरा तसेच प्रवाशी हितांच्या बाबीसह स्थानकाच्या स्वच्छतेचे असलेले कटाक्षाने लक्ष, रेल्वेतील हटवलेले अतिक्रमण, शिवाय बर्हाणपूर, मनमाड, जळगाव आदी ठिकाणचे शेकडो वर्ष जीर्ण घरांसह दुकानाचे कायदा-सुव्यवस्था धक्का न लागता काढलेल्या अतिक्रमणामुळे रेल्वेची शेकडो एकर मोक्याची जागा अतिक्रमणमुक्त झाली आहे. शिवाय त्यामुळे भुसावळात रेल्वे डब्याच्या कारखान्यासाठी मिळालेला हिरव्या कंदिलामुळे भुसावळ विभागाच नावलौकीक सर्वदूर पोहोचवण्यात यादव यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानकांनी कात टाकली नूतनीकरणामुळे रेल्वे प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळाला आहे शिवाय अनुचित प्रकार रोखण्यासाठी उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही लावून रेल्वेच्या प्रगतीत महत्वपूर्ण योगदान यादव यांनी दिल्याने त्यांच्या एकूणच सर्व कार्याची रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दखल घेत त्यांचा दिल्लीत सन्मान केला. यादव यांना मिळालेल्या पुरस्कारानंतर त्यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.