भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींना अंतरीम जामीन

न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा : बाजारपेठ पोलीस ठाण्यात नोंदवला जवाब

भुसावळ : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी आमदार संतोष चौधरींविरोधात गुन्हा दाखल असून शनिवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाने त्यांना अंतरीम जामीन मंजूर केल्यानंतर रविवारी दुपारी त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात हजेरी लावलत आपला जवाब नोंदवला. प्रसंगी चौधरी म्हणाले की, मुख्याधिकार्‍यांना आपण ओळखत नाही, पाहिलेले देखील नाही, राजकीय आकस व दबावापोटी आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हा आपल्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून खोट्या गुन्ह्यांना आपण भीक घालत नाही, असेही ते म्हणाले.