भुसावळ- मुंबई येथील शेख फाऊंडेशनतर्फे उल्लेखनीय कार्याबददल ‘रे ऑफ होप’ पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानीत करण्यात येते. यंदाच्या वर्षासाठी भुसावळचे माजी नगरसेवक साबीर शेख यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शेख यांनी केलेल्या सामजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शनिवार, 23 जून रोजी सकाळी 11 वाजता शुकरान हॉल, साकी नाका, खैरानी रोड, अंधेरी, मुंबई येथे एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून तिबेटचे भारतीय राजदूत बापूसाहेब भोसले यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याने साबीर शेख यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.