भुसावळचे माजी नगराध्यक्ष विजय चौधरी भाजपात !

0

जळगाव: भुसावळचे माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते विजय चौधरी यांनी आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार हरिभाऊ जावळे, नगराध्यक्ष रमण भोळे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक नामदेव ढाके आदी उपस्थित होते.