भुसावळचे साबीर शेख ‘रे ऑफ होप’ पुरस्काराने सन्मानित

0

भुसावळ- सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भुसावळचे माजी नगरसेवक साबीर शेख यांना ‘रे ऑफ होप’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मुंबई येथील साकीनाका भागात शुक्राणू हॉलमध्ये नुकताच हा कार्यक्रम झाला. यावेळी अविनाश धर्माधिकारी, काँग्रेस नेते रमजान चौधरी व अय्युब मन्यार, भाजपा नेता दिवस दीक्षीत, शिवसेना नगरसेवक सांगले, नगरसेवक हरीष पवार, साकिनाका पोलीस स्टेशन स्टाफ , राज्य स्तरावरील आदर्श शिक्षक मो.रफिक शेख, आर.टी.आए. कारकुन अनिल गुळगुळे व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.