भुसावळ : स्वीकृत नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवार, 10 रोजी निष्पन्न झाले आहे. बुधवारी महाविद्यालयातील सर्व सहकार्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर त्यात प्रा.नेवे यांचा अहवालदेखील पॉझीटीव्ह आला. दरम्यान, प्रा.नेवे म्हणाले की, कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आली असलीतरी घाबरण्याचे कारण नाही कारण आतापर्यंत केलेल्या कर्मावर विश्वास असल्यामुळे तब्येतीला काही होणार नाही, असा आत्मविश्वास आहे. सध्या 17 मार्चपर्यंत होम आयसोलेशनमध्ये असून गेल्या तीन दिवसात जे जे सहकारी माझ्या संपर्कात आलेले असतील त्यांनी स्वतःहून टेस्ट करून घ्यावी व आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.