भुसावळच्या अंतर्नादतर्फे पिंप्री शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

0

शाळेच्या वर्गखोलीसाठी निधी देणार -आमदार हरीभाऊ जावळे

भुसावळ- भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे यावल तालुक्यातील पिंप्री येथील प्राथमिक शाळेत 70 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शाळेच्या एका वर्गखोलीसाठी स्थानिक विकास निधी देणार असल्याची ग्वाही आमदार हरिभाऊ जावळे यांनी या कार्यक्रमात दिली. अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांची चिमुकली शर्वरीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.

यांची होती कार्यक्रमास उपस्थिती
विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून राबवण्यात आलेला हा उपक्रम दिशादायक व पथदर्शी आहे. समाजातील प्रत्येक घटकाने त्यातून बोध घ्यावा, अशी अपेक्षा आमदार जावळे यांनी व्यक्त केली. जिल्हा परीषदेचे माजी सदस्य हर्षल पाटील, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अनिल सपकाळे, अरुण सपकाळे, महा-आयटी समन्वयक जितेंद्र कोळी, ज्ञानेश्वर घुले, संदीप रायभोळे, प्रदीप सोनवणे, मुख्याध्यापक योगेश इंगळे, उपशिक्षक सुरेंद्र शेंडे, अमितकुमार पाटील, भूषण झोपे, मोहन कोळी, सतीश भोई, सागर कोळी, विजय तायडे, सतीश तायडे, लक्ष्मण सपकाळे, राहुल सपकाळे, ग्रामसेवक प्रवीण कोळी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अंतर्नादचे अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ जावळे यांचे जनसंपर्क अधिकारी संदीप पाटील यांनी केले.

व्यायामाचे साहित्य देणार -आमदार
प्राथमिक शाळेसाठी एक वर्गखोली बांधून मिळावी, असे साकडे ग्रामस्थांनी आमदार जावळे यांना घातले. त्यानंतर त्यांनी स्थानिक विकास निधी या कामासाठी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही दिली. तसेच तरुणांनी आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यायामशाळा बांधणार आहोत. व्यायामाचे साहित्य द्यावे, अशी मागणी केली. व्यायामशाळा बांधकाम झाल्याचे प्रमाणपत्र आणून द्या. आपण साहित्य देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असेही जावळे यांनी येथे नमूद केले.