भुसावळच्या इंजिन घाटावर अनोळखीचा बुडाल्याने मृत्यू

0

शहर पोलिसांनी केले ओळख पटवण्याचे आवाहन

भुसावळ- शहरातील तापी नदी पात्रातील इंजिन घाटाजवळ 30 ते 35 वर्षीय अनोळखी इसमाचा शुक्रवारी सकाळी सव्वा आठ वाजेपूर्वी मृतदेह आढळला. या इसमाने आत्महत्या केली की पोहताना बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला याबाबत माहिती कळू शकली नाही. अनोळखी इसमाच्या खिशात पाकिट आढळले असून त्यात त्याच्या पत्नीचे छायाचित्र आहे मात्र हा इसम कोण, कुठला, तो येथे कसा आला? याबाबत माहिती कळू शकली नाही. या इसमाची ओळख पटत असल्यास शहर पोलीस ठाण्याशी 02582-222200 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी केले आहे. अरुण उत्तम रंधे यांच्या खबरीनुसार शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक के.टी.सुरळकर करीत आहेत.