भुसावळच्या कैद्यांचे आश्‍वासनानंतर उपोषण मागे

0

औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात बंदोबस्तात रवानगी

जळगाव :- भीमा-कोरेगाव दंगलीनंतर भुसावळात झालेल्या दगडफेकीनंतर 18 जणांविरुद्ध कलम 307 चा गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयीत आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींची जळगाव कारागृहात रवानगी केल्यानंतर त्यांनी 307 चे कलम मागे घेण्यासाठी सोमवारपासून आमरण उपोषण छेडल्याने खळबळ उडाली होती. बुधवारी या कैद्यांना बंदोबस्तात औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आले. तेथे डीआयजी राजेंद्र धामणे यांनी आरोपींची समजूत काढत योग्य ती मदत व मार्गदर्शन करण्याचे आश्‍वासन दिल्याने या कैद्यांनी उपोषण मागे घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

यांचा होता उपोषणात सहभाग
विजय उर्फ बाळा सारंग पवार या कैद्याच्या नेतृत्वाखाली रवींद्र सुरेश पगारे, सदानंद गजानन खंडेराव, भावेश अनिल भालेराव, नितीन महेंद्र खरे, भगवान बुध्दीमान गायकवाड, श्रावण रमेश देवरे, अमोल साहेबराव बनसोडे, तुषार विद्याधर वाघ, चेतन नरेंद्र आव्हाड, नितीन राजेंद्र वाघ, विशाल संजय कोचुरे, भीमा देवमन इंगळे, आशिष शरद सोनवणे,किशोर सिध्दार्थ सोनवणे, आकाश सुनील सपकाळे, आकाश भीमराव वानखेडे, विशाल पुरुषोत्तम सपकाळे व संगीत बाजीराव खंडेराव यांनी उपोषण छेडले होते.