भुसावळच्या खेळाडूंनी पटकावले 12 सुवर्णपदके

0

भुसावळ। हरियाणा येथील पानीपत येथे राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत देशभरातील विविध राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. यात भुसावळच्या 12 खेळाडूंनी सुवर्ण तर 6 खेळाडूंनी रौप्य पदक पटकावले. अ‍ॅम्युचर अ‍ॅन्ड प्रोफेशनल किक बॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. यात सार्थक ठाकुर याने सुवर्ण पदक, जयेश पाटील सुवर्ण, क्रिश वाल्मिक सुवर्ण, सुदेश पाठक, गणेश चव्हाण, साहिल कछवे, रुतिका आठवले, अर्पिता भालेराव, राजेश्‍वरी गोडाले, सचिन बुंदेले, शुभांगिनी रोकडे, साहिल बग्गन, सानिया बग्गन यांनी सुवर्ण पदक पटकावले तर तन्वीर अहमद, आयुष ठाकुर, राजेश आगरकर, जयेश गायकवाड, कृष्णा भोळे यांनी रौप्य पदक पटकावले.

विजयी झालेल्या खेळाडूंचा केला सत्कार
विजयी झालेल्या खेळाडूंचा नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळ सचिव इब्राहिम खान, राजेंद्र निकम, राजेश तायडे, पी.पी. बेंडाळे, समाधान वाहुळकर, किरण चव्हाण, जगदिश कछवे, सुनिल पाटील, कृष्णकुमार वाल्मिक, दत्तात्रय पाठक, राजेश आठवले, राकेश सपकाळे, महेश तायडे, रियाज खाटीक, नितीन हिवरकर, दामिनी बुंदेले, धनराज बाविस्कर, सुमेध शेजवळ, प्रशिक्षक भिमज्योत शेजवळ यांची उपस्थिती होती.