भुसावळ: शहरातील खडका रोड भागातील गरोदर विवाहितेला श्वसन व हृदयाचा त्रास झाल्याने जळगावच्या ओम क्रिटीकल केअर सेंटरमध्ये हलवण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू झाला. 25 रोजी सायंकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. आरती देवेंद्र जोशी (36) असे मयत विवाहितेचे नाव आहे. पंकज राणे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करून ती बाजारपेठ पोलिसात वर्ग करण्यात आली. तपास इरफान काझी करीत आहेत.