अपर अधीक्षकांनी केली घटनास्थळाची पाहणी; मुख्य आरोपी पसारच
भुसावळ: बसस्थानकात झालेल्या गोळीबारातील जखमी सचिन सोनवणे हा मुक्ताईनगरात आढळला असून पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी त्यास सोबत घेत भुसावळात आणल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. गोळीबार करणारा मुख्य संशयीत आरोपी अजय गोडाले हा त्याच्या किसन नावाच्या साथीदारासह दुचाकीवर पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी शुक्रवारी सकाळी बसस्थानकातील गोळीबार झालेल्या जागेची पाहणी केली. प्रसंगी सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, बाजारपेठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार उपस्थित होते.