भुसावळच्या चार नगरसेवकांना नोटीस

0

भुसावळ। पहिल्याच भुसावळ शहराच्या सत्तांतर झाल्यानंतर चार महिन्यांनंतर भुसावळची पहिली सर्वसाधारण सभेचे आयोजन नगराध्यक्षांच्या सुचनांद्वारे करण्यात आले होते. बैठकीतील 11 क्रमांकाच्या ठरावावर गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळामध्ये रद्द करण्यासाठी जनाधार विकास पार्टीच्या चार नगरसेवकांनी विरोध करता मुख्याधिकार्‍यांच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रकारामुळे मुख्याधिकारी बाविस्कर यांनी अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात पाठविला होता.

15 दिवसांची मुदत
नगरसेवकांनी जिल्हाधिकारीकडे तक्रार नोंदविली होती. त्यानंतर तीन महिन्यांनंतर नगर विकास खात्याकडून सर्व बाबींचा संदर्भ घेवून या चार नगरसेवकांना 15 दिवसांच्या आत खुलासा सादर करण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. येथील नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये जनाधार पक्षाचे गटनेता तसेच तीन नगरसेवकांनी मुख्याधिकार्यांशी हमरीतुमरी केली असता मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपात्रतेचा प्रस्ताव पाठविला होता. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तो प्रस्ताव मंत्रालय येथे पाठविण्यात आला होता. प्रस्तावाच्या कारवाईसाठी नगर विकास खात्याने भुसावळच्या नगरसेवक उल्हास पगारे, रविंद्र सपकाळे, संतोष त्र्यंबक चौधरी व पुष्पा जगन सोनवणे या चार नगरसेवकांना 15 दिवसांच्या आत कारणे दाखवा नोटीस नगर विकास खात्यातर्फे भुसावळ नगरपालिकेमार्फत नगरसेवकांना बजावण्यात आली आहे.