भुसावळ : ईलेक्ट्रीक ऑफीसर असल्याची बतावणी करून वीज बिल (electricity bill) भरण्याच्या नावाखाली भुसावळातील डॉक्टर दाम्पत्याच्या खात्यातून तीन लाख 98 हजार 999 रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात (jalgaon cyber cell police station) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सायबर पोलिसात गुन्हा
तक्रारदार हे भुसावळ शहरातील एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचे डॉक्टर (Docter) आहे. 23 आणि 24 जानेवारी रोजी त्यांच्या त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक मॅसेज आला. त्यात ईलेक्ट्रिसिटी ऑफीसर रोहित असे नाव सांगून वीज बिल भरण्यासाठी त्यांना एक लिंक पाठवण्यात आली. लिंक ओपन करून डॉक्टरांनी त्यांच्यासह त्यांच्या पत्नी यांच्या बँकेची सर्व माहिती दिली. समोरील रोहित नावाच्या व्यक्तीने दोघांच्या खात्यातून सुमारे 3 लाख 98 हजार 999 रुपये परस्पर काढून घेतले.
सायबर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी सोमवारी 24 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता धाव घेवून रोहित नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात (jalgaon cyber cell police station) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे (pi liladhar kande) करीत आहे.