भुसावळच्या तरुणाची नॅशनल क्राइम कंट्रोल ऑर्गनायझेशन (दिल्ली) या संघटनेच्या ‘महाराष्ट्र राज्य संघटनमंत्री’ या पदावर नियुक्ती
भुसावळचे डॉ.निलेश मधुकर राणे यांचे नुकतेच दिल्ली स्थित राष्ट्रीय गुन्हेगारी प्रतिबंध संघटनेच्या ‘महाराष्ट्र राज्य संघटनमंत्री’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थानिक पातळीवरील गुन्हेगारी व भ्रष्टाचारास प्रतिबंध आणि कायदा सुव्यवस्थेस बळकटी देणारी नॅशनल क्राइम कंट्रोल ऑर्गनायझेशन (दिल्ली) ही राष्ट्रीय स्तरावरील एकमेव संघटना आहे.
ही संघटना पोलीस प्रशासनास मदत करते तसेच समाजातील गोरगरीब व वंचित घटकांना मोफत कायदेशीर सल्ला तसेच मदत करण्यास सदैव तत्पर असते.
या माध्यमातून महाराष्ट्र तसेच जळगांव जिल्ह्यातील पोलीस प्रशासनास मदत करण्यास व गरजू व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यास कटिबद्ध असल्याचे यावेळी डॉ.निलेश राणे यांनी सांगितले आहे.
डॉ. निलेश राणे यांना नुकतीच दिल्ली येथुन मानद डॉक्टररेट ही पदवी देखील दिली आहे, तसेच राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात त्यांच्या अनमोल योगदान आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासंदर्भात देखील डॉ.निलेश यांचे अतिशय मोलाचे योगदान आहे.
राज्याभरातून क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.