भुसावळ :- भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे गुरुवार, 25 रोजी होत असल्याची माहिती ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक यांनी मंगळवारी पत्रकार परीषदेत दिली. ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील 60 महाविद्यालयातील 600 विद्यार्थी आपला कलाविष्कार प्रसंगी सादर करणार आहेत. प्रसंगी चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, प्रसिद्धीप्रमुख प्रशांत पाटील आदींची उपस्थिती होती.