भुसावळ- भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय परीषद शुक्रवारी झाली. सुमारे 50 संशोधक प्राध्यापक तसेच संशोधक विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग नोंदविला. संगणक व माहिती तंत्रज्ञानातील ‘नवीन विचार प्रवाह’ या विषयावर सखोल विवेचन उपस्थित संशोधकांनी केले. तसेच 20 संशोधकानी आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले. उद्घाटन जळगाव विद्यापीठातील स्कुल ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस विभाागाचे संचालक प्रा.डॉ.बी.व्ही.पवार यांनी केले. अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक होते. प्रमुख अतिथी म्हणून सचिव विष्णू चौधरी, प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, आयोजन समिती सचिव प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे यांची उपस्थिती होती.
तीन सत्रात राष्ट्रीय परीषद
प्रथम सत्रात प्रा.डॉ.बी.व्ही.पवार यांचे बीजभाषण झाले. त्यांनी इमर्जींग ट्रेडस इन कॉम्प्युटर सायन्स ऑन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रीसर्च या विषयावर मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात संशोधकांनी शोधनिबंधाचे वाचन केले. अखेरच्या सत्रात सिनेट सदस्य प्रा.ई.जी.नेहेते प्रमुख पाहुणे होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे होत्या. सहभागी संशोधक प्राध्यापक. संशोधक विद्यार्थी यांना प्रमाण पत्र वाटप केले. संयोजक प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य व परीषदेचे समन्वयक डॉ.बी.एच.बर्हाटे, आयोजन समिती सचिव प्रा.स्वाती फालक. व सर्व संगणक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.