दुरूस्तीच्या कामाला एप्रिलमध्ये सुरूवात
भुसावळ :- मुंबई येथील एल्फिन्स्टन रोडवरील पूलाच्या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेतील सर्वच पादचारी पूलांचे स्ट्रक्चरऑडीट करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून आल्याने त्यांची अंमलबजावणी करीत भुसावळ येथील जुन्या पादचारी पूलाचे (दादरा) विविध विभागाच्या अधिकार्यांनी मिळून गेल्या दोन महिन्यांपूर्वी ऑडीट केले होते. ऑडीट अहवालानुसार पूलाच्या दुरूस्तीसाठी रेल्वे बोर्डाकडून 2 कोटी 68 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. 23 मार्च रोजी याकामासाठी निवीदा प्रक्रीया पूर्ण होणार असल्याने एप्रिल महिन्यात पूलाच्या दुरूस्तीला प्रत्यक्ष सुरूवात होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.