भुसावळच्या पु.ओं. नाहाटा महाविद्यालयात ‘नृत्यस्वरांजली 2018’

0

भुसावळ: शहरातील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात 2, 3 आणि 4 जानेवारी रोजी ‘नृत्यस्वरांजली 2018’ चे आयोजन करण्यात आले आहे. 2 जानेवारी रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 3.45 पर्यंत महाविद्यालयातील सामाजिकशास्त्र, भूगोलशास्त्र, वनस्पतीशास्त्र व अर्थशास्त्र विभागात रांगोळी, चित्रकला, कोलाज, व्यंगचित्र, क्ले मॉडेलिंग, स्पॉटपेंटींग अशा विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. 3 रोजी रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या कालावधीत फोटोग्राफी, पारंपरीक वेशभूषा या स्पर्धांचे महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग व महाविद्यालय परीसर लॉन या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे तर 4 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 पर्यंत महाविद्यालयातील जीमखाना मैदानात नृत्यस्वरांजली 2018 मध्ये गीत गायन, नृत्य, पाश्चिमात्य गायन, सीनेगीत, भावगीत, एकलनृत्य मिमिक्री इत्यादी कलाप्रकारांचे सादरीकरण विद्यार्थी करणार आहे. या स्पर्धांसाठी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेशभाऊ फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमारजी नाहाटा व संचालक उपस्थित राहतील.