भुसावळ। मक्का येथे गेलेल्या भुसावळ येथील भाविकाचा पहिल्या तवाकनंतर शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. मोहम्मद रफिक हाजी इब्राहीम बागवान (68) असे मयत भाविकाचे नाव आहे. शहरातील मो.रफिक हे पत्नी गुलशन बी मोहम्मद रफिक बागवान (60) यांच्यासोबत 22 रोजी मुंबईहून मक्कासाठी रवाना झाले होते. एक तवाक पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
सौदी सरकारने याबाबत कुटुंबियांना सूचित केल्यानंतर दफनविधीसाठी मुलगा हाफिज रफिक बागवान हा शुक्रवारी दुपारी रेल्वे मुंबईपर्यंत व तेथून विमानाने तातडीने मक्काकडे रवाना झाला. मयत मो.रफिक शेख हे भुसावळचे माजी आमदार स्व.हाजी यासीन बागवान यांचे नातेवाईक होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परीवार आहे.