जळगाव । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलातर्फे भुसावळातील पथरोड, पंडित या दोन तर चोपड्यातील एक अशा तीन टोळ्या वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी मंगळवारी ही कारवाई केली. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे तीन टोळ्यांमधील 21 जणांना हद्दपार करण्यात आले आहे. या टोळ्यांमधील सदस्यांत अक्षय उर्फ ‘म्हैस की मुंडी’ या गुन्हेगाराची समावेश आहे.
भुसावळातील पथरोड टोळीमधील टोळीप्रमुख बंटी परशुराम पथरोड, विष्णू परशुराम पथरोड, विजय परशुराम पथरोड, देवा परशुराम पथरोड, शिव परशुराम पथरोड, अजय परशुराम पथरोड व विशाल पुनम पथरोड (सर्व रा. वाल्मीक नगर), पंडित टोळीतील प्रमुख रायसिंग सरदारसिंग पंडित, अजय उर्फ पापाराम रायसिंग पंडित, गोलू उर्फ धरमसिंग पंडित, तिलक मनोज चंडाले, सोनु उर्फ जयसिंग रायसिंग पंडी, अक्षय उर्फ म्हैस की मुंडी, कैलास बडगुजर, तुषार गणेश तुडनायक, सागर पप्पू तिवाल व गुड्डू उर्फ मरमसिंग रायसिंग पंडित यांचा समावेश आहे. चोपड्यातील रुपेश गोकुळ भालेराव, बंटी उर्फ प्रशांत गुलाब वाघ, याका उर्फ याकूब युसुफ सरदार व अजय कैलास साळुंखे (रा.अकुलखेडा, ता.चोपडा) यांचा समावेश आहे. या टोळ्यांसह गुन्हेगारांच्या हद्दपारीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम व दत्तात्रय बडगुजर यासाठी परिश्रम घेतले.