भुसावळ-जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. देशभरात यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान भुसावळ येथे रेल्वेच्या लोको पायलट मंडळ प्रशिक्षण केंद्राने (डीटीसी, टीआरओ, ) योगा करून योग दिन साजरा केला. मुख्य प्रशिक्षक अलोक श्रोत्रीया, प्रशिक्षक आर.सी.रावत, प्रशिक्षक संदीप उपाध्याय, एम.एच,इंगळे, वाय.डी.ढाके, प्रवीण प्रसाद आदींसह प्रशिक्षणार्थी लोको पायलट यांनी योगा केला. रेल्वेच्या लोको पायलट विभागाच्या कर्मचारी देखील यात सहभागी होते.
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात यावा या भारताच्या मागणीला संयुक्त राष्ट्राने २०१४ मध्ये मान्यता दिली. त्यानंतर २०१५ पासून २१ जून रोजी जगभरात योग दिन साजरा केला जातो. भारतातही सर्वसामान्यांसह राजकीय नेतेही योग दिन साजरा करतात. याशिवाय भारतीय दूतावासांच्या समन्वयातून १५० देशांमध्येही योगदिनाचे कार्यक्रम राबवले जात आहेत.